हीच वेळ आहे….
तुमची वेबसाईट बनवा !
परवडणाऱ्या खर्चात आपल्या संस्थेची किंव्हा कंपनीची आकर्षक वेबसाईट आजच बनवून घ्या.
याचा उपयोग काय?
वेबसाईट बनविण्याचे फायदे अनेक आहेत
प्रत्येकासाठी ते वेगवेगळे आहेत.
व्यवसाय वाढीसाठी याचा उपयोग होतो.
आपला व्यवसाय ऑनलाईन आणल्याने आपले ग्राहक कित्येक पटीने वाढतात.
कौशल्य इतरांना दाखवू शकता.
आपल्याला कोणकोणत्या गोष्टी येतात याची जगाला माहिती मिळते.
विविध कल्पना निर्माण करू शकता.
अनेक उपयोगी स्टार्टअप कल्पना तुम्ही सर्वांसाठी निर्माण करू शकता.
जगभरात आपला ठसा उमटवू शकता.
संपूर्ण जग आपल्याला आणि आपल्या' कार्याला ओळखू शकेल.
थोडक्यात आमच्याबद्दल
बियॉंड वेबची कामाची पद्धत...
ज्याप्रमाणे २ किलो पेढे आपण विकत घेणार असलो तर सुरुवातीला आपण एक पेढा टेस्ट करायला घेतो. याचे कारण नंतर पश्चाताप करण्याची वेळ यायला नको. फक्त एक पेढा टेस्ट केल्याने देखील आपल्याला आपण विकत घेत असलेल्या इतर पेढ्यांच्या क्वालिटीची कल्पना येते.
बियॉंड वेबमध्ये देखील आमची कामाची पद्धत काहीशी अशीच आहे. इथे आम्ही कुणाचेही काम घेण्यापूर्वी त्यांना त्यांच्यासाठी बनविणाऱ्या वेबसाईटचा डेमो दाखवितो. त्यानंतर कामाचा खर्च सांगतो. याचे कारण प्रत्येक काम निराळे असल्याने प्रत्येकाचा खर्च निराळा असतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे आपण डेमो आणि त्यासाठी येणारा खर्च पाहून ठरवू शकता कि, आम्हाला काम द्यायचे कि नाही? तो पर्यंत आपल्याला काहीही पेमेंट करायची गरज नाही. आम्ही डेमो अगदी मोफत बनवितो.
१९९८ पासून आम्ही इंटरनेट आणि वेबसाईट क्षेत्रात कार्यरत आहोत.
वेबसाईट सोबत इतरही अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामे आम्ही केली आहेत.
वेगवेगळ्या क्षेत्रातील शेकडो ग्राहकांना आम्ही समाधानकारक सेवा दिली आहे.
कामाचे क्षेत्र
आम्ही प्रामुख्याने वेबसाईट बनवितो
वेबसाईट बनविण्याचे निरनिराळे पर्याय सध्या जगभरात उपलब्ध आहेत. परंतु सर्व पर्यायांपैकी आम्ही वेबसाईट बनविण्यासाठी ‘वर्डप्रेस’ या सर्वात अग्रगण्य प्रकारात वेबसाईट बनवितो.
‘वर्डप्रेस’ या प्रकारात वेबसाईट बनविण्याचे फायदे असे कि, आपण स्वतः देखील वेबसाईट अपडेट करायला सहज शिकू शकता. इतकेच नाही तर आपण फार कमी वेळात शिकून त्यामध्ये आपल्याला हवे त्याप्रमाणे बदल देखील करू शकता.
कामाची सुरुवात
नियमित विचारले जाणारे प्रश्न
मुळीच नाही! वेबसाईट हे क्षेत्रच असे आहे कि, इथे कुणाला न भेटताच आपल्याला त्यांना आपण करत असलेल्या आणि केलेल्या कामाची माहिती देऊ शकतो. म्हणुनच आम्ही देखील हेच सुचवितो कि, आपण काहीही पैसे न देता प्रथम डेमो बघा आणि मग काम द्यायचे कि नाही ते ठरावा.
आम्ही तुम्हाला डेमोची लिंक देऊ, त्यामुळे प्रत्यक्ष भेटण्याची गरज नाही.
कामाचे पैसे हे आपण डेमो पसंत केल्या नंतर कामाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यापूर्वी ठरलेले असतात. त्यामुळे काम झाल्यावर आपल्याला एकूण किती पेमेंट करायचे आहे? याची कल्पना आपल्याला आधीच असते. आपण नेट बँकिंग, बँक डिपॉझिट, UPI मोबाईल पेमेंट, चेक अशा कोणत्याही मार्गाने पेमेंट करू शकता.
नाही. वेबसाईट बनविताना सुरुवातीला डोमेन आणि होस्टिंग विकत घेण्यासोबत डिझाईन बनविण्यासाठी खर्च येतो. परंतु पुढील वर्षी वेबसाईट आधीच बनली असल्याने डोमेन आणि होस्टिंगचे रीनिव्हल आणि वेबसाईटवरील प्रोग्राम अपडेट करण्याचा (AMC) खर्च येतो. रीनिव्हलचा खर्च सुरुवातीच्या खर्चापेक्षा खूप कमी असतो.
आपल्या वेबसाईटसाठी डेमो बनविणे म्हणेज प्रत्यक्षात खरीखुरी वेबसाईट बनविण्याचेच हे काम असते. कारण साधारण २-३ डेमो बघूनच आपण त्यातील एक डेमो डिझाईन आपल्या वेबसाईट साठी निवडता.
डेमो डिझाईन साठी आम्ही आपल्या वेबसाईटसाठी लागणाऱ्या गोष्टी जसे लोग, माहिती, फोटो मागून घेतो आणि त्यापासून डेमो वेबसाईट बनवितो. हि डेमो वेबसाईट आम्ही आमच्या सर्व्हर वर अपलोड करून त्याची लिंक आपल्याला पाठवितो. त्यामुळे आपण आपल्या घरी/ऑफिसमध्ये बसून डेमो बघू शकता.
- मो. +91 9892241433
काही निवडक कामे
क्लायंटसाठी बनविलेल्या काही वेबसाईट
आधीच बनविलेली वेबसाईट आहे का?
तुमची वेबसाईट रिडिझाईन करून घ्या !
बऱ्याच वेळेस असे देखील होते कि, आपण आधीच आपली वेबसाईट इतर कुणाकडून तरी बनवून घेतलेली असते जी नंतर आपल्याला छान वाटत नाही. म्हणून आपल्याला ती नव्याने बनवून घ्यायची असते. किंव्हा काही वर्षांनी आपली वेबसाईट जुनी आउट डेटेड होते, अशा परिस्थिती मध्ये देखील ती नव्याने बनविणे आवश्यक असते.
आम्ही आपल्याला जुन्या वाटणाऱ्या किंव्हा कालबाह्य झालेल्या वेबसाईट नव्या कोऱ्या गाडी प्रमाणे आकर्षक आणि सुंदर बनवून देण्याचे काम देखील करतो. त्यामध्ये आपल्या वेबसाईट वरील सर्व डेटा जसाच्या तसा ठेवून नवीन डिझाईन मध्ये वेबसाईट बनविली जाते.
आता विचार कसला करताय?
आजच आम्हाला संपर्क करा.
अत्यंत नाविन्यपूर्ण आणि आकर्षक वेबसाईट
बनविण्यात आम्ही पारंगत आहोत.